Breaking News

समाज विकासात माध्यमांचे योगदान मोठे : कवडे

 अहमदनगर । प्रतिनिधी । 05 - विकासाच्या व समाज मन घडविण्याच्या प्रक्रियेत माध्यमांचे योगदान मोठे आहे. शेती व ग्रामीण विकासामध्येही माध्यमांची भुमिका महत्वाची आहे. पुढे ही महत्वाचीच राहणार आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले. 
रविवारी सकाळी केंद्रीय माहिती आणि प्रसारन मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पुणे येथील पत्र सुचना कार्यालयामार्फत येथील उदयनराजे पॅलेस येथे पत्रकारासाठी एकदिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेद्र नवाल, पत्र सुचना कार्यालयाच्या संचालिका अल्पना पंत, माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पत्र सुचना कार्यालयाच्या सहाय्यक अधिकारी शिल्पा पोकळे, व व्याख्याते अभिजीत घोरपडे, अरविंद जोशी, संतोष अजमेरा,प्रा.राऊत यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येऊन संचालिका अल्पना पंत यांनी उपस्थित  मान्यवरांचा यथोचित गौरव केला. 
प्रमुख पाहणु म्हणून बोलतांना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, नियम, कायदे, योजना, आल्या यापेक्षा त्यांची अंमलबजावणी महत्वाची आहे. आधिनियमांची अंमलबजावणी करण्याची यंत्रणा आहे. मात्र, मुलभूत स्वभाव बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ही त्यांनी केले. मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी पाणी, पीक पध्दती, पर्यावरण, वाळू चोरी,तसेच वाचन संस्कृती या प्रश्‍नांचाही ऊहापोह केला. वेगवेगळी मार्मिक उदाहरणे देऊन त्यांनी सर्व प्रश्‍नांवर विवेचन केले.    या प्रसंगी शैलेद्र नवाल यांचे भाषण झाले. दुपारच्या सत्रात प्रसार माध्यम  याविषयावर संतोष आजमेरा, माहितीचा  अधिकार आणि पत्रकारिता या विषयावर प्रा.शिवाजी राऊत तसेच वॉटर हारवेस्टींग आणि कृषी समस्या तसेच  शेतीला पुरक जोडधंदे  विषयावर अरविंद जोशी यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. शेवटी सहाय्यक अधिकारी शिल्पा पोकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.