Breaking News

राजस्थानमध्ये लव्ह जिहाद, तरुणाला जिवंत जाळले

जयपूर : 'लव्ह जिहाद'च्या कथित आरोपावरून एका कामगाराला मारहाण करीत जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना राजस्थानच्या राजसमंद भागातील राजनगरात बुधवारी घडली. शंभूलाल रेगर नामक आरोपीने या कृत्याचे व्हिडीओ चित्रण करीत ते सोशल मीडियावर अपलोड केले. 


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुरुवारी पोलिसांनी आरोपीस अटक केली. घटनेतील संवेदनशीलता लक्षात घेता राज्य सरकारनेही पुढील तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे.यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अफ्रझुल असे मयत व्यक्तीचे नाव असून तो पश्चिम बंगालचा रहिवासी होता.