Breaking News

जामखेडमध्ये मोकाट डूकरांनी मांडला उच्छाद.


जामखेड/श. प्रतिनिधी/-  जामखेड शहरामध्ये मोकाट जनावरांनी मोठा उच्छाद मांडला आहे. मोकाट कुत्रे, डूकरे यांनी नागरिकांना अगदी सळो की पळो करून सोडले आहे. अनेक वेळा नगरपरिषदकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. परंतु नगरपरिषद प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेत नाही. 
शहरामध्ये गल्लीबोळात, सार्वजनिक ठिकाणी, शाळा, भाजीबाजार, मच्छीबाजार, प्रत्येक हाँस्पीटल परिसरात (तेथील घाणीमूळे) बस स्थानक परिसरात अगदी डांबरी रस्त्यावर सुद्धा या मोकाट डूकरांचा मूक्त वावर वाढला आहे.

अनेक वेळा या डूकरांमूळे वाहनचालकांचा तोल जाऊन अपघात घडत आहेत. काही शाळेच्या परिसरात या डूकरामूळे शिक्षक व मूलांना मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कारण यांना हाकलले तर सरळ ते अंगावर धावून येतात व चावा घेऊन जख्मी करतात. त्यामुळे वर्ग बंद करून बसावे लागते, असे शिक्षकांनी सांगितले.

भाजी बाजारातील घाणीमूळे या डूकरांचा वावर बाजारात वाढला असून नागरीकांना जाण्या येण्यासाठी ही जनावरं मोठा अडथळा निर्माण करतात.

शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भटक्या डूकरांनी थैमान घातले असून, आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. शहरामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्यामूळे या डूकरांची संख्याही वाढली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून शहराच्या आसपास असलेल्या अनेक भागात डूकरांची दहशत वाढली आहे. 

नागरिकांच्या तक्रारी वाढूनही प्रशासन मात्र ढिम्मच आहे. या डॉक्टरांच्या मालकांच्या भीतीपोटी कोणीही फारसे तक्रार करण्यासाठी पूढे येत नाहीत.तरी सार्वजनिक ठिकाणी यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.बसस्थानक परिसरासह विविध भागात मोकाट डूकरांचा सुळसुळाट झाला आहे.

यांच्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह सकाळी पहाटे व रात्री पायी फिरायला जाणार्‍यांमध्येही दहशत असून,नागरिकांकडून याबाबत वारंवार तक्रारी केल्या जात असल्या,तरी नगरपालिकेमध्ये मोकाट जनावरे व डुकरे पकडण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणाच अस्तित्वात नाही.