Breaking News

बिबवेवाडीतील नागरिकाची 11 लाखांनी ऑनलाईन फसवणूक


पुणे , दि. 01, डिसेंबर - बिबवेवाडीतील एका इसमाच्या बँक खात्यातून अज्ञात चोरट्याने 11 लाख रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी श्रीकांत काशीकर (वय-45, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 25 नोव्हेंबर रोजी अचानकपणे 11 लाख 27 हजार 750 रुपये काढून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक इंदलकर अधिक तपास करीत आहेत.