प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधील दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी
पुणे, दि. 25, डिसेंंबर - प्रवासामध्ये महिलेच्या पर्समधील सुमारे दोन लाखांचे दागीने चोरीला गेले आहेत. ही घटना शिवाजीनगर ते ताथवडे या प्रवासात घडली.याप्रकरणी अरुंधती नवनाथ गटकुल (वय 65 रा. उपळाई, ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गटकुले या ताथवडे येथे पाहुण्यांकडे आल्या होत्या. ताथवडे येथे येण्यासाठी त्यांनी शिवाजीनगर येथून पीएमपीएमएल बसने प्रवास केला. ताथवडे बस स्टॉपवर उतरुन त्या रिक्षाने घरी आल्या. घरी आल्या नंतर त्यांनी पर्स तपासली असता पर्समधील 1 लाख 86 हजार 250 रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले.याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून वाकड पोलीस तपास करत आहेत.