Breaking News

रेल्वे स्टेशन परिसराला विकासात्मक रुप देण्याचे काम राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केले -आ.संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या विकासात्मक दृष्टीकोनातून राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम चालू आहे. रेल्वे स्टेशन परिसराला विकासात्मक रुप देण्याचे काम राष्ट्रवादीचे नगरसेवक गव्हाळे व सौ.पवार यांनी केले. नागरिकांनी मागणी केलेल्या रस्त्यासाठी पाठपुरावा करुन, त्यांनी स्टेशन परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे काम मार्गी लावले. यामुळे या परिसराचा कायापालट झाल्याची भावना आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.

प्रभाग क्र.28 रेल्वे स्टेशन येथील गवळीवाडा व बोहरी चाळ परिसरातील रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके तर यावेळी नगरसेवक विजय गव्हाळे, नगरसेविका आशाताई पवार, संभाजी पवार, चंदू औशीकर, विजय धोत्रे, आदिनाथ कोकाटे, विजय गायकवाड, नवनाथ खंडेराव, महेश सुपेकर, संकेत गव्हाळे, संजय जरबंडी, गौरव गव्हाळे, गोपीनाथ जरबंडी, गणेश भंडारी, भाऊ गोरे, हिरा पाडळ, शिवा शिवचरण, भारत कदम, बाळासाहेब ठाणगे, विक्रम गायकवाड, हेमंत थोरात, खलील शेख, रवी शिरसाठ, संजय शिंदे, मुस्ताक शेख, बाबासाहेब जगधने, समीर शेख, अक्षय बहिरवाडे, आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजय गव्हाळे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कामे केली पाहिजे. रेल्वे स्टेशन प्रभागातील विकासात्मक कामे मार्गी लावून, दिलेल्या आश्‍वासनाची वचनपुर्ती करण्यात आली आहे. तसेच आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून रेल्वे स्टेशन परिसरात अनेक विकासात्मक कामे मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. दलितवस्ती निधी अंतर्गत रेल्वे स्टेशन येथील गवळीवाडा व बोहरी चाळ रस्त्याचे काँक्रीटीकरण होवून, नागरिकांना चांगला रस्ता उपलब्ध होणार आहे.