Breaking News

कत्तलखान्यातून वासरांची सुटका

संगमनेर/प्रतिनिधी -  शहरातील ‘जमजम’ कॉलनीतील वाहिद करीम कुरेशी यांच्या कत्तलखान्यावर छापा टाकून पोलिसांनी १० हजार रुपये किंमतीच्या पाच वासरांची सुटका केली. रविवारी दुपारी १२ वाजता शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. गोकुळ औताडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


यात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या पाच वासरांची सुटका करण्यात आली. याबद्दलची माहिती पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पो. नि. औताडे यांच्यासह मुख्य हवालदार इस्माईल शेख, हवालदार सुनील ढाकणे, सचिन सोनावणे व नितीन शिंदे आदींच्या पथकांने याठिकाणी छापा मारून पाच वासरांची सुटका केली.