Breaking News

दाऊदने हाकलले छोट्या शकीलला कराचीतून !

आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या डी गँगला आता शेवटीची घरघर लागली आहे. दाऊदचा खास हस्तक छोटा शकील हा त्याच्यापासून दुरावला आहे. दाऊदचा लहान भाऊ अनिस आणि छोटा शकील यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर दाऊद टोळीची सूत्रे हाती घेण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान छोटा शकीलला दाऊद टोळीतून हाकलवण्यात झाल्याचे वृत्त आहे. 


इक्बाल कासकरला अटक करण्यामागे शकीलचा हात असल्याचा संशयदाऊदला आल्याचेदेखील बोलले जात असून यावर गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेवून आहे.१९९०च्या काळात मुंबई गुन्हेगारीवर राज्य करणाऱ्या दाऊद इब्राहिमने दुबईत पळ काढला तेव्हापासून त्याच्यासोबत शकील बाबू मियाँ ऊर्फ छोटा शकील हा एक विश्वासू साथीदार म्हणून वावरत होता. दुबईतून बस्तान गुंडाळल्यानंतर दाऊदने छोटा शकीलला पाकिस्तान कराचीतदेखील आपल्यासोबत ठेवले. 

गेल्या ३० वर्षांपासून छोटा शकील दाऊद टोळीची इमाने इतबारे सूत्रे हाकताना दिसत होता. दरम्यानच्या काळात छोटा शकील आणि दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम यांच्यात वाकडे आले होते. मात्र दाऊद त्यांच्या भांडणात नेहमी छोटा शकीलची बाजू घेत सारवासारव करीत असे.