Breaking News

नक्षल्यांचा स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा साठा सुरक्षा दलाने जप्त केला


रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यातील घनदाट जंगलामध्ये नक्षलवाद्यांनी जमिनीखाली दडवून ठेवलेला स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा साठा सुरक्षा दलाने जप्त केला. सीमा सुरक्षा दल आणि जिल्हा दलाने संयुक्तरीत्या ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दुर्गंकडल पोलीस स्थानकाच्या हद्दीतील मानहाकेल आणि हेथेल गावादरम्यान नक्षलवाद्यांनी शस्त्रसाठा दडवून ठेवला होता. बीएसएफ आणि जिल्हा दलाने संयुक्तरीत्या कारवाई करत हा शस्त्रसाठा जप्त केला, अशी माहिती कांकेरचे पोलीस अधीक्षक के.एल. ध्रुव यांनी दिली. जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यात दोन मोर्टार बॉम्ब, ३ ग्रेनेड, एक देशी बनावटीची पिस्तूल, ३० इले्ट्रिरक डिटोनेटर्स, एके ४७ रायफलचे जिवंत काडतूस, एसएलआर आणि ३१५ बोअर रायफल्स व इतर नक्षल साहित्याचा समावेश आहे.