अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील अपक्ष आणि विविध पक्षांच्या ९७७ उमेदवारांमध्ये १९८ कोट्यधीश आहेत. उमेदवारांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीचे विश्लेेषण करत दोन स्वयंसेवी संस्थांनी ही बाब आपल्या अहवालातून शनिवारी समोर आणली आहे. त्यानुसार सर्वाधिक १४१.२२ कोटी रुपयांची संपत्ती एका काँग्रेसच्या उमेदवाराकडून घोषित करण्यात आली आहे. तर १२३.७८ कोटींसह भाजप उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ६५ करोडपती उमेदवारांनी आपली संपत्ती ५ कोटीहून अधिक असल्याचे घोषित केले आहे. तर ६० जणांनी आपली चल आणि अचल संपत्ती ही २ कोटी ते ५ कोटीच्या घरात असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ९७७ पैकी ९२३ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेेषण डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स संस्था आणि गुजरात इलेक्शन वॉच या दोन स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आले आहे.
गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९७७ उमेदवारांमध्ये १९८ कोट्यधीश
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:40
Rating: 5