पोलिसांप्रमाणे डॉक्टर्सही आता दुर्गम भागात सेवा देणार
सिंधुदुर्गनगरी, दि. 03, डिसेंबर - पोलीस दलात ज्याप्रमाणे दुर्गम भागात सेवा करणे सक्तीचे आहे तसेच आता राज्यातल्या तज्ञ डॉक्टरानी पण दुर्गम भागात सेवा करण्याची अट घालावी असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्यची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात एका कार्यक्रमानिमित्त भेट दिल्यांनतर के सरकर बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य खात्यात जेवढ्या त्रुटी आहेत त्या सर्व दूर करा, त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही केसरकर यांनी यावेळी दिली.सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात कर्करोगच्या पार्श्वभूमीवर मौखिक तपासणी शिबीराच आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने केसरकर यांनी रुग्णालयात भेट दिली आणि समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्ह्यातले तापाचे रुग्ण कमी झाले असून आता फक्त 35 रुग्ण असल्याचे यावेळी केसरकर म्हणाले.