बारादरी गाव बनले पोलीस दादांचे गाव ! ७० ते ८० मुले पोलीस दलात कार्यरत
या गावची ख्याती म्हणजे निसर्गरम्य वातावरण डोंगराळ भाग गावातील इतर सोईसुविधा व पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी मोकळे मैदान अशी सुविधा आहे. त्याचबरोबर बारादरी गाव ते चांदबिबी महाल या दरम्यान जो डांबरी रस्ता आहे. यावरून वाहतूक कमी असल्याने मुलांना धावण्यासाठी उपयोगी ठरत आहे. मागील पाच वर्षांपासून या गावातील सर्वाधिक मुले पोलीस भरती झाली आहेत. या गावातील पोलीस नाईक दत्तात्रय पोटे युवराज पोटे, संजय पोटे, राम पोटे, गणेश पोटे, सचिन पोटे हे तरुण सध्या पोलीस दलात कार्यरत आहेत.
हे गावाकडे सुट्टीला आल्यानंतर गावतील तरुणांना एकत्र करुन पोलीस दलाविषयी माहिती व मार्गदर्शन करतात. पोलीस दलात भरती होण्यासाठी कश्याप्रकारे प्रयत्न करू, शकतो त्याचबरोबर पोटे हे तरुणांकडून पोलीस दलात भरती होण्यासाठी मैदानी तयारी करुन घेतात. एखादा तरुण जर मैदानात कोणत्या ठिकाणी कमी पडतो, त्याला त्यासाठी तयारी करायलाच लावतात, त्यांचा एक नियम आहे. तरुणांना शिक्षा देऊन त्यांच्याकडून मैदानी व बुद्धीमत्ता करुन घेत आहेत. त्यामुळे हे मुलांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. परिसरातील बारादरी हे गाव म्हणजे पोलीस दादांचे गाव आहे, या नावाने चर्चेला येऊ लागले आहे. येथील गावातील इतर मुलांप्रमाणे आपल्या मुलांनीही पोलीस दलात भरती व्हावे, अशी स्वप्ने येथील पालक पाहत आहेत.
१.
१.