Breaking News

केंद्रीय मंत्री हेगडेच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

नेवासा/ शहर प्रतिनिधी/- संविधानात बदल करण्याची भाषा वापरणाऱ्या केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांच्या कथित वक्तव्याचा त्यांच्या पुतळयास चप्पल मारून तीव्र निषेध करण्यात आला.नेवासा येथील एस.टी. स्टँड समोर भाजपचे केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांचा पुतळा लावण्यात येऊन चपलाचा हार घालण्यात आला. तसेच उपस्थित विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी हेगडे यांच्या कथित वक्तव्याचा त्यांच्या पुतळ्याला चप्पल मारून तीव्र निषेध व्यक्त केला.


यावेळी बोलताना काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष व लोकशाही विचार मंचचे अध्यक्ष संजय सुखधान म्हणाले की संविधानाबद्दल व त्यात बदल करण्याची भाषा व वक्तव्य करणाऱ्या अनंत हेगडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात यावे,तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय सुखधान यांनी यावेळी आपल्या भाषणातून व्यक्त केली . तसेच संविधानाबद्दल वक्तव्य करणाऱ्यांना बहुजन समाजातील नागरिकांनीआगामी निवडणुकीत जागा दाखवून द्यावी व संविधान सुरक्षीत रहाण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्यांची सत्ता देशात आणावी असे आवाहन देखील त्यांनी केले.

यावेळी गफूरभाई बागवान,काँग्रेसच्या नगरसेविका शालिनी सुखधान, कान्हू दाणे, गणेश चौघुले मुन्नाभाई शेख,विष्णू इंगळे,अँड.सुदाम ठुबे,अँड.चंद्रकांत कदम,व्यापारी जयकुमार गुगळे, गणेश कोरेकर,आप्पा गायकवाड, मनोज कपिल,कैलास साळवे,प्रकाश सोनार,गणेश वायचळ,राहुल पवार,करण मुकुटमल,येशूदास चक्रनारायण,अमित जेधे,अजय त्रिभुवन,आकाश इंगळे,विशाल शिनगारे, सचिन पवार,बब्बू बागवान,विशाल जाधव सुमित शेरे,सिद्धार्थ सुखधान,पृथ्वी सुखधान, नादराबाई भालेराव, वंसा सुखधान ,वंदना इंगळे,सरसा इंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.