Breaking News

भक्तांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर उपाययोजना : भोईटे


शिर्डी/प्रतिनिधी - शिर्डीत साईबाबा दर्शनासाठी परराज्यातून येणाऱ्या साईभक्त व त्यांची वाढणारी संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर साईबाबांचे दर्शन करून देतो, असे सांगून बनावट पास देणारे, भक्तांची फसवणूक करणारे वाढतच आहेत. त्यामुळे अशा लोकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नियोजनबद्ध हालचाली सुरु केल्या आहेत, अशी माहिती पोलीस उपधीक्षक आनंद भोईटे यांनी ‘दै. लोकमंथन’शी बोलतांना दिली. ते म्हणाले, की भक्तांचे आर्थिक शोषण करणारे, त्यांना वेठीस धरणारे या लोकांच्या विरोधात कारवाई सुरु केली आहे. 
कोणी कितीही मोठा असला परंतु भक्तांना वेठीस धरत असेल तर आणि भक्तांच्या तक्रारी आल्या तर अशा लोकांची अजिबात गय केली जाणार नाही. मंदिरातील दर्शनासाठी येणारे भक्त त्यांच्या फसवणुकीचे विविध प्रकार या सर्वच प्रकाराकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. भक्तांच्या सेवेसाठी साईबाबा संस्थान व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचे परिणाम दिसायला काही दिवस लागतील. मात्र अनेक दिवसांपासून सुरु असलेले भक्तांच्या आर्थिक शोषणाचे यामुळे उघडकीस येईल. भक्तांची आर्थिक फसवणूक करणारे त्यांना पाठबळ देणाऱयांकडे सुद्धा लक्ष आहे. ३ दिवसांपूर्वी बनावट पास हाच खरा आहे, असे सांगून पैसे लुबाडणाऱ्या चार तरुणांना गजाआड जावे लागले. साईभक्तांची चांगली सेवा व मार्गदर्शन करून दोन पैसे कमवणाऱ्या व्यक्तीबद्दल पोलीस व सुरक्षा रक्षकांचा सकारात्मक दृष्टीकोण आहे. मात्र फसवणूक करणाऱ्याला आपण सोडणार नाही, अशी भूमिका भोईटे यांनी स्पष्ट केली.