Breaking News

शनिवारी देशातील पहिले मोदी घरकुल घरकुल वंचितांची जेलभरो आंदोलनाची घोषणा

घरकुल वंचितांसाठी पंतप्रधान आवास योजनेची घोषणा होवून तीन वर्ष उलटून गेले असताना, सरकार घरकुल वंचितांच्या प्रश्‍नाची दखल घेत नसल्याने मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने शनिवार दि.23 डिसेंबर रोजी इंपिरीयल चौकात देशातील पहिले मोदी घरकुल उभारण्याची घोषणा करण्यात आली. तसेच या प्रश्‍नावर घरकुल वंचितांनी जेलमध्ये जाण्याची तयारी दर्शवली. नुकतेच हुतात्मा स्मारक येथे झालेल्या घरकुल वंचितांच्या बैठकिय या आंदोलनाची घोषणा झाली. 


घरकुल वंचितांच्या प्रश्‍नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. मोदींच्या प्रतिमेचे पुजन करुन आंदोलनास प्रारंभ केला जाणार आहे. 350 स्के. फुटाचे घर बांधून, जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना कार्यन्वीत करण्यासाठी सरकारी पडिक जागा उपलब्ध करण्याची तसेच महाराष्ट्रात घरकुल हमी कायदा मंजुर करण्याची मागणी केली जाणार असल्याचे बैठकित स्पष्ट करण्यात आले. या बैठकिसाठी अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, अंबादास दरेकर, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, पेंन्टंय्या वल्लाकट्टी, लक्ष्मी दुस्सा, शारदा भालेकर, निता पगारे, गीता डहाळे, लीलाबाई भोसले, रंजना गायकवाड, शांताबाई खुडे, सुनिता साबळे आदि उपस्थित होते.
अ‍ॅड.कारभारी गवळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरकुल वंचितांच्या घरांची घोषणा करुन तीन वर्षे उलटली असताना ही योजना अद्यापि कागदावरच आहे. घरकुल वंचितांचा प्रश्‍न न सोडविता त्यांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, घरकुल वंचितांना गाजर दाखविण्यात आलेला आहे. मनपाच्या वतीने घरकुल वंचितांची यादी तयार करुन त्याची पोथी बनविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
अशोक सब्बन यांनी घरकुल वंचितांना संघर्ष केल्याशिवाय घरे मिळणार नाही. सामाजिक न्यायासाठी संघटित होवून संघर्ष केल्यानेच आंदोलनाला यश येणार आहे. निवार्‍याचा मुलभुत प्रश्‍न सोडविण्यासाठी घरकुल वंचित रस्त्यावर उतरल्याशिवाय त्यांची घरे साकार होणार नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.