Breaking News

आयपीएलचा लिलाव जानेवारीत?

मुंबई/ वृत्तसंस्था । 18 :-  आयपीएलचा लिलाव डिसेंबरच्या अखेरीस गोव्यामध्ये होणार असल्याची रंगतदार चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती; परंतु हा लिलाव पूर्वनिश्‍चित कार्यक्रमानुसार जानेवारीच्या अखेरीस अथवा फेब्रुवारीच्या सुरवातीलाच होणार असल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. आयपीएलचा लिलाव 28 डिसेंबरला गोव्यामध्ये होणार असल्याची चर्चा अचानक सुरू झाली होती, परंतु हा लिलाव 25 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यानच होईल, असे भारतीय मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले आहे. 

हा लिलाव गोव्यामध्ये नव्हे तर बंगळूरलाच होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली जात आहे. आयपीएल लिलाव काही दिवसांत घेणे सोपे नसून या लिलावासाठी मोठ्या प्रमाणावर पूर्वतयारी करावी लागते. केवळ काही दिवसांची नोटीस देऊन हा लिलाव घेता येत नाही, असे भारतीय मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले; तर आयपीएल फ्रँचाईजनी या लिलावासाठी पूर्वतयारी करण्यास वेळ लागतो. कोणाला घ्यायचे, कोणासाठी कसून प्रयत्न करायचे, किती रक्कम द्यायची यांसारख्या अनेक गोष्टी निश्‍चित करण्याची गरज असते, असे सांगितले आहे.