शहरामधील शिवाजी चौकाचे नामकरण करण्याची मागणी
सिंधुदुर्गनगरी, दि. 09, डिसेंबर - कणकवली शहरामधील शिवाजी चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शिवाजीनगरचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज नगर असे करण्यात यावे. या मागणीसाठी सकल मराठा समाज कणकवली यांच्यावतीने कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा माधुरी गायकवाड व मुख्याधिकारी अवधुत तावडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्टसह हिंदुस्थानचे प्रेरणास्थान असून आम्हा मराठी माणसांचे दैवत आहेत. कणकवली शहरामध्ये तेलीआळी हायवे चौक येथे आणि शिवाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असलेले प्रेम, आदर आणि भावना लक्षात घेता सकल मराठा समाजाच्या मागणीनुसार कणकवली शहरामधील शिवाजी चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शिवाजीनगरचे छत्रपती शिवाजी महाराज नगर असे आदरपूर्वक नामकरण करण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा योग्य आदर राखला जावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली.
मराठा समाजाची मागणी 30 दिवसांत पुर्ण न झाल्यास सकल मराठा समाजाच्यावतीने शिवाजी चौकात आणि शिवाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नामकरणाचे फलक लावण्यात येतील याची नगरपंचायतीने नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
कोणत्याही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा नामोल्लेख एकेरी असु नये तो छत्रपती असाच असावा. असेही यावेळी सुचित करण्यात आले. नगरपंचायतीला निवेदन देताना क णकवली तालुक्यातील बहुसंख्य मराठा समाजाच्या बंधु, भगिनी उपस्थित होत्या.