Breaking News

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आमंत्रितांच्या स्पर्धा; नाशिक व कोल्हापूर संघ विजयी

नाशिक, दि. 09, डिसेंबर - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणार्‍या आमंत्रितांची क्रिकेट स्पर्धेच्या सुपरलीगमध्ये नाशिक संघाने अँबिशिअस संघावर 6 गडी राखून तर कोल्हापूर संघाने जालना संघावर 37 धावांनी विजय मिळवला.

अनंत कान्हेरे मैदानावर अँबिशिअस संघाने प्रथम फलंदाजी करत 41 षटकात सर्वबाद 144 धावा केल्या, सौरभ जगदाळेने एकाकी किल्ला लढवत 69 धावा केल्या, डावखुरा फिरकी गोलंदाज गौरव काळे ने भेदक गोलंदाजी करत 35 धावात 6 गडी बाद केले, तर यासर शेखने 43 धावात 3 गडी बाद करत अँबिशिअस संघाचा डाव लवकर गुंडाळला.


उत्तरादाखल नाशिक संघाने 31 षटकात 4 बाद 148 धावा करत 6 गडी राखून विजय मिळविला, यासर शेखने 41धावा , श्रीकांत शेरीकर ने 37 तर मुर्तुझा ट्रंकवालाने नाबाद 22 धावा केल्या. भारत शर्माने 28धावात 3 गडी बाद केले.महात्मा नगर क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात कोल्हापूर संघाने 41 षटकात सर्वबाद 203 धावा केल्या, साहिब शिबेने 66, हर्षल बोरसेने 35 तर रोहित पाटीलने 26 धावा केल्या, शोएब सैय्यदने 51 धावात 5 गडी बाद केले.उत्तरादाखल जालना संघ 39 षटकात 166 धावा करू शकला, ह्रिषिकेश काळेने 39 तर आशिष देशमुखने 35 धावा केल्या, रोहित पाटीलने उत्कृष्ठ गोलंदाजी करत 14 धावात 4 गडी बाद केले.