विद्यार्थ्याचा धरणात बुडून मृत्यू
ठाणे: सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बदलापूरमधील बॅरेज धरणात बुडून मृत्यू झाला. सगिर अहमद इदायदतुल्ला शेख मंसूरी (17) असे मृत विद्यार्थाचे नाव आहे. 48 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
मानखुर्द येथे राहणारा सगिर 10 वीत शिकत होता. आपल्या शाळेच्या काही विद्यार्थांसोबत बॅरेज धरणावर सगिर सहलीसाठी आला होता. यावेळी बंदरावर तो उभा असताना त्याचा पाय घसरुन तो धरणात पडला. या प्रकरणात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
