Breaking News

पाचशे रुपयांची लाच घेतांना हवालदारास अटक

संगमनेर / प्रतिनिधी - गुन्हा दाखल करून घेऊ नये, यासाठी पाचशे रुपयाची लाच मागणारा शहर पोलीस ठाण्यामधील पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ आश्रुबा खेडकर याला नगरच्या लाचलुचपत पथकाने अटक केली. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका किरकोळ गुन्ह्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी तबरेज मोमीन या इसमाकडून हेड. कॉ. रघुनाथ खेडकर याने पाचशे रुपयाची लाच मागितली होती. सदर इसमाकडे मोबाईलव्दारे अनेक वेळा पैशांची मागणी केली होती. 



याबाबत तक्रारदाराने थेट नगर येथील लाचलुचपत विभागाकडे खेडकर याची तक्रार केली होती. या तक्रारीनुसार आज {दि.३०} सकाळी नगर येथील लुचपतच्या पथकाने शहर पोलीस स्टेशन आवारातच सापळा रचून खेडकर याला ताब्यात घेतले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विष्णू ताम्हणे यांच्या फिर्यादीवरून खेडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.