हज यात्रेतील ‘मेहरम’ प्रथा बंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात घोषणा
नवी दिल्ली : तात्काळ तिहेरी तलाकनंतर मोदी सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, मुस्लीम महिलांना हज यात्रेसाठी बंधनकारक असलेली ‘मेहरम’ प्रथा बंद करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जर एखादी मुस्लीम महिला हज यात्रेला जाऊ इच्छित असेल, तर तिला मेहरम (एक पुरुष संरक्षक) शिवाय जाता येत नव्हते.
याबाबत अधिक माहिती घेतल्यावर मला समजले की, ही प्रथा सुरु करण्यामागे आम्हीच लोक आहोत. या प्रथेला कोणत्याही इस्लामिक देशात मान्याताच नाही. मोदी पुढे म्हणाले की, अल्पसंख्याक मंत्रालयाने यावरील निर्बंध काढून टाकले आहेत. त्यामुळे कोणतीही मुस्लीम महिला पुरुष संरक्षकाशिवाय हज यात्रा सहज करु शकते. विशेष म्हणजे, आत्तापर्यंत 1300 महिलांनी विना मेहर हज यात्रा करण्यासाठी अर्ज केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
‘मेहरम’ म्हणजे ज्या मुस्लिम महिलेचा विवाह झालेला नाही. ती महिला आपले वडील, सख्खा भाऊ, मुलगा आणि नातवाशिवाय हज यात्रेला जाऊ शकत नव्हती. त्यामुळे हज यात्रेसाठी मुस्लीम महिलेला ‘मेहरम’ अतिशय आवश्यक असायचा. अनेक उलेमा मुस्लीम महिलांना एकट्याने हज यात्रा करणे म्हणजे शरियतच्या विरोधी असल्याचं सांगतात. दरम्यान, हज यात्रेसंदर्भातील नियमानुसार, वयाची 45 वर्ष पूर्ण केलेल्या महिलेला विना ‘मेहरम’ हज यात्रा करता येत होती. पण आता हिच प्रथा बंद केल्याने कोणत्याही वयोगटातील मुस्लीम महिलेला हज यात्रा करता येणार आहे.