Breaking News

राहुरी नगर परिषदेने सुरु केली एस एम एस सेवा


राहुरी प्रतिनिधी - पालिकेकडून नागरिकांना ज्या ज्या सेवा दिल्या जातात, त्या सर्व सेवा, विविध प्रकारचे दाखले, तक्रारीचे अर्ज यांची त्वरित दखल घेऊन त्याबाबतचे मेसेज (एस एम् एस) सुविधा सुरु करण्यात आली आहे. या एस एम् एस सेवेची सुरुवात नगरपालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. या सेवेचा शहरातील नागरिकांनी लाभ घेऊन आपापले मोबाईल नंबर पालिकेच्या कार्यालयात द्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केले.
नगराध्यक्ष तनपुरे यावेळी म्हणाले, की नगरपालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नागरीकाना चांगल्या सुविधा देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.व त्या दृष्टीने निवडणुकीच्या काळात जी जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. नगरपालिकेच्यावतीने देण्यात येणारे कायमस्वरूपी लागणारे जन्म मृत्यू दाखला, बांधकाम परवाना दाखला नळ जोडणी विविध प्रकारचे उतारे दाखले ह्यासाठी जे अर्ज नसगरिकांकडून केले जातात त्या अर्जाचे आवक जावक रजिस्टरला नोंद केल्यानंतर ताबडतोब संबंधित नागरिकांना त्याचा मेसेज एसएमएस दिला जातो सदर काम किती कालावधीत होईल त्याबाबतची सूचना ह्या मेसेज मुळे दिली जाते ह्यासाठी नागरिकांनी अर्ज दिल्यावर त्या अर्जावर आपला मोबाईल नंबर देणे आवश्यक असल्याचे यावेळी तनपुरे यांनी सांगितले. सदर सुविधेसाठी शासनाच्या ‘MYNET’ या प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.

नगराध्यक्ष तनपुरे म्हणाले, की नगरपालिकेत कर भरण्यासाठी कायम नागरिकांना पालिकेत यावे लागते. नागरिकांना कर भरण्यासाठी यापुढे पालिकेत येण्याची गरज राहणार नाही. त्यासाठी ऑनलाइन कर भरण्याची सुविधा जानेवारी महिन्यात सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने एचडीएफसी बँकेने विनामूल्य सेवा देण्याचे मान्य केले आहे. यासाठी पालिकेने ३ बँकांशी बोलणी केल्याचे तनपुरे यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, दशरथ पोपळघट, प्रज्ञा गोसावी, चेतन धनान आदी उपस्थित होते.