Breaking News

पत्नीकडून पतीने स्विकारला सरपंचपदाचा पदभार!


श्रीगोंदा  तालुक्यातील उक्कडगावमध्ये नवनिर्वाचित सरपंच नवनाथ भानुदास म्हस्के यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी माजी सरपंच हेमलता नवनाथ म्हस्के यांच्याकडून सरपंचपदाचा कार्यभार हाती घेतला. नगर तालक्याच्या राजकीय क्षेत्रातील ही बहुदा पहिलीच घटना आहे. 
यावेळी मनोगत व्यक्त करतांना सरपंच म्हस्के म्हणाले, की यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो, हे यामुळे स्पष्ट झाले. यापुढे गावच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू. पत्नी माजी सरपंच यांनी गावच्या विकासासाठी जो पुढाकार घेतला, ही त्याचीच पावती आहे. 

यावेळी बोलताना हेमलता म्हस्के म्हणाल्या, की ज्या पद्धतीने गावचा पाच वर्षे विकास केला व त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, तशीच विकासकामे करुन घेण्यासाठी यापुढेही नेहमीच प्रयत्न करीन. यावेळी सतिष साठे, राजु म्हस्के, भगवान शिंदे, सुभाष तिपोले, प्रभाकर म्हस्के, दत्तु रोखले संतोष वाडेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.