Breaking News

पिंपरी गावातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकास अटक

पुणे, दि. 25, डिसेंंबर - जमीन गैरव्यवहार प्रकरणी पिंपरी गावातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकास चिंचवड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई करण्यात आली. नरेश ठाकुरदास वाधवानी असे अटक करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. वाधवानी हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. 


फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी वाधवानी यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला नाही.
आठ दिवसांपूर्वी त्यांचा अपील अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. तेव्हापासून चिंचवड पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर आज त्यांना अटक केली आहे. अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली. चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.