Breaking News

मॉडर्न चिल्ड्रन अ‍ॅकॅडमी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला व्यसनमुक्ती व स्वच्छतेचा संदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील मॉडर्न चिल्ड्रन अ‍ॅकॅडमी शाळेच्या वतीने व्यसनमुक्ती व स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांचे फलक हातात घेवून, जोरदार घोषणाबाजी करीत नागरिकांना व्यसनमुक्ती व स्वच्छतेचा संदेश दिला. 


या जनजागृती रॅलीचे उद्घाटन पोलिस खात्याचे जाकिर शेख यांच्या हस्ते झाले. मुकुंदनगरच्या प्रमुख रस्त्यावरुन मार्गक्रमन करुन मॉडर्न चिल्ड्रन अ‍ॅकॅडमी शाळेत याचा समारोप झाला. यावेळी उपस्थितांना व्यसनमुक्ती व परिसर स्वच्छ ठेवण्याची सामुदायिक शपथ देण्यात आली. तर विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगून, व्यसनापासून आरोग्यावर होणार्‍या दुष्परिणाम विशद करण्यात आले.
शाळेचे संस्थापक स्व.हाशिम सय्यद यांनी शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध जनजागृती व सामाजिक उपक्रम राबविले होते. त्यांच्या पश्‍चात हे उपक्रम चालू असल्याची माहिती अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष तथा माजी नेव्ही ऑफिसर जावेद सय्यद यांनी दिली. प्राचार्या डॉ.राबिया सय्यद यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेत घेण्याता अलेल्या क्रीडा स्पर्धा, विविध बौध्दिक परिक्षा व विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी संचालिका जैबुनिसा सय्यद, सार्जंट मेजर, गोपाळ घरे, मजहर खान, उप प्राचार्या फैमिदा खान, युनूस शेख आदि उपस्थित होते.