भिवंडीत आईशी संबंध ठेवणा-याचा मुलांनी केला खून
ठाणे, दि. 25, डिसेंंबर - भिवंडीतील संगमपाडा-पांजरापोळ येथे आईशी अनैतिक संबंध ठेवणा-याचा 2 मुलांनी धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण खून केल्याची घटना घडली. अब्दुल हफिज अन्सारी असे त्याचे नाव आहे. तर सरफराज शेख व सैफ शेख अशी खून करणा-या मुलांची नावे आहेत. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघेही आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.अब्दुल अन्सारी हा येथील चाळीत कुटुंबीयांसह राहत होता. त्याचे शेजारी राहणा-या विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. ही बाब त्या महिलेच्या मुलांना समजली. त्यानंतर बदनामीच्या भीतीने त्या मुलांनी रागाच्या भरात अब्दुल याच्यावर पाठीमागून हल्ला करत धारदार हत्याराने वार केले. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृ ती गंभीर असल्याने मुंबईतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
