Breaking News

बिबट्याच्या हल्ल्यात तरवाडेत सात पिले ठार ?

जळगाव, दि. 01, डिसेंबर - चाळीसगाव तालुक्यातील तरवडे गिरणा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरू असतानाच येथे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात एक शेळी व सहा पिले काल मध्यरात्रीच्या सुमारास ठार झाले आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र हा हल्ला बिबट्याने केला कि इतर हिंस्त्र प्राण्याने केला याबाबत अद्याप खुलासा झाला नसल्याचे सूत्रांची सांगितले .


याबाबत माहिती अशी की , येथील रहिवासी परमेश्‍वर भगवान चौधरी यांची शेती गावाजवळच्या न्हावे रस्त्यालगत आहे. परमेश्‍वर चौधरी हे नेहमीप्रमाणे सायंकाळी शेतात गाय, बैल, शेळ्या बांधून गेले होते. शेळ्या या सहा फूट उंच जाळीत बांधल्या होत्या. काल मध्यरात्रीच्या सुमारास एका हिंस्त्र प्राण्याने एक शेळी व सहा पिले ठार केले.
त्यांच्या पोटाचा भाग त्यानेखाल्याचे चित्र सकाळी दिसून आले. परमेश्‍वर चौधरी हे सकाळी शेतात गेल्यानंतर हा सगळा प्रकार लक्षात आला. दरम्यान काल रहीपुरी येथे म्हशीचे पारडू व वडगाव लांबे येथे शेळी ठार झाली आहे. यामुळे हे हल्ले बिबट्याने केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकरी संजय मोरे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली व मृत शेळ्यांचे छायाचित्र पाठवले. त्यावर ते म्हणाले की, प्राण्याच्या हल्ल्यावरून हा हल्ला बिबट्याने केला नसल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.