Breaking News

आदिवासी क्षेत्रात रोजगार निर्मिती व बालकांना पोषक आहारासाठी ‘स्वयंम प्रकल्प’

नाशिक, दि. 01, डिसेंबर - ग्रामीण परिसरातील कुक्कुटपालन आणि अनुसूचित क्षेत्र आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यातील मुलांना आहारामध्ये अंड्यांचा पुरवठा क रणे, कुपोषण रोखणे व स्वयंरोजगार निर्मिती करण्याकरिता सन 2017-18 ते 2019-20 या कालावधीत राज्यस्तरीय जनजाती क्षेत्र उपाययोजनांतर्गत जिल्ह्यातील दोन एक ात्मिक प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात ‘स्वयंम’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक अंतर्गत दिंडोरी, नाशिक, पेठ, इगतपुरी व त्र्यंबक तालुके आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण अंतर्गत बागलाण, क ळवण, सुरगाणा, देवळा याप्रमाणे एकुण 9 आदिवासी बहुल तालुक्यात आदिवासी प्रवर्गातील लाभार्थीसाठी स्वयंरोजगार निर्मिती करणे आणि कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे, तसेच या माध्यमातून अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण कमी करणे या उद्दिष्टासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, एकात्मिक बालविकास प्रकल्प व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने प्रकल्प राबविण्यात येणार आहे.


प्रत्येक तालुक्यात अनुसूचित गावामधून प्राधान्याने भूमिहीन शेतमजूर, अत्यल्प व अल्पभूधारक अशा 417 आदिवासी प्रवर्गातील लाभार्थ्यांना चार आठवड्याचे कोंबड्यांचे सुधारित देशी जातीचे लिंगभेद न केलेले 45 पक्षी तीन टप्प्यात शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येईल. कुक्कुटपालन करणे या पद्धतीने पालनपोषण करुन त्याद्वारे अंडी उत्पादन वाढविणे हे उद्दिष्ट आहे. याकरिता निवड झालेल्या लाभार्थींचे प्रशिक्षण व क्षमतावृद्धी विभागामार्फत करण्यात येईल.