Breaking News

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोन सराईतांना पोलीस कोठडी

पुणे, दि. 24, डिसेंबर - पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोन सराईतांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांना 25 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. मुजूमदार यांनी दिला आहे.राजेश ऊर्फ राजू माणिक राठोड (वय 32, रा. वाघोली), धोंडीभाऊ महादू जाधव (वय 25, रा. निघोज, ता. पारनेर, जि. नगर) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. 


वाघोली गावच्या हद्दीत 20 डिसेंबर रोजी दुपारी पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामध्ये 4 गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे असा 1 लाख 6 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी राजू याचा निघोज प रिसरात वाळूचा व्यवसाय आहे. तो आणि त्याचा साथीदार वाळूमाफियांना पिस्तूल विकण्यास आले होते का, याबाबत तपास करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केली.