Breaking News

पत्नीचा छळ करणार्‍या पतीला अटक

पुणे, दि. 24, डिसेंबर - विवाहितेचा कौटुंबिक छळ करून तिच्याकडील 11 लाख रुपयांच्या दागिन्यांचा तसेच 26 लाख 60 हजार रुपयांच्या रोख रकमेचा अपहार केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.टी. शेजवळ-काळे यांनी दिला आहे.


सौरभ संजय घोरपडे (29, रा. माणिक बाग, सिंहगड रोड मु.पो. एंकुबे, ता. कोरेगाव जि. सातारा) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणात दिलीप शिवाजीराव देशमुख, चतुराबाई शिवाजीराव देशमुख (80, रा. माणिकबाग, सिंहगड रोड), सायली आवटी (रा.ऑस्ट्रेलिया) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पल्लवी सौरभ घोरपडे (26, रा. नांदेडसिटी) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सौरभ याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्याचा अधिक तपास क रण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील अनंत चौधरी यांनी केली. न्यायालयाने त्यानुसार पोलीस कोठडी सुनावली.