Breaking News

कतरिनासोबत रोमान्स करणार रणवीर

दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या आगामी सिनेमात सुपरस्टार रणवीर सिंह मुख्य भूमिका साकारत असून, या सिनेमात त्याच्यासोबत बार्बी डॉल कतरिना कैफची वर्णी लागणार आहे. या सिनेमाचे नाव 'सिम्बा' असे असून, नुकतेच त्याचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. 


ज्यानंतर रणवीरप्रेमी त्याच्या या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. या सिनेमासाठी सर्वात प्रथम सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच्या नावाची चर्चा होती; परंतु सारा 'केदारनाथ' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर या सिनेमासाठी श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरचे सुद्धा नाव चर्चेत आले होते; परंतु रोहितने कतरिनाला पसंती दर्शविली असली तरी अधिकृतरित्या याची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. 

जर रणवीर-कतरिनाने सोबत रोमान्स करण्यास होकार दिला तर रुपेरी पडद्यावर प्रथमच ही जोडी रोमान्स करताना दिसेल. विशेष म्हणजे, रणवीर सिंगची पे्रयसी, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफमध्ये कोल्डवॉर सुरू आहे. त्यामुळे जर रणवीरने कतरिनासोबत अभिनय करण्यास होकार कळवला, तर दीपिकाची काय रिॲक्शन असेल याच्याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. रणवीर सध्या सिम्बाच्या शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. तर कतरिना तिच्या 'टायगर जिंदा है' चे प्रमोशन करण्याच्या कामात व्यस्त आहे.