Breaking News

शेती करण्यास महिलेला मज्जाव करणारा फतवा काढल्याप्रकरणी धर्मगुरूसह ६ जणांना अटक


बांगलादेशात शेती करण्यास महिलेला मज्जाव करणारा फतवा काढल्याप्रकरणी एका मुस्लिम धर्मगुरूसह (इमाम) एकूण सहा जणांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. देशातील पश्चिमेकडील शहर कुमारखली जिल्ह्यातील एका महिलेला शेतमजुरी करण्यास बंदी घालण्याचे फर्मान त्यांनी सोडले होते. 
स्थानिक पोलीसप्रमुख अब्दुल खलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमारखलीस्थित एका मशिदीत शुक्रवारची विशेष नमाज अदा केल्यानंतर एका इमामने महिलेला शेतमजुरीसाठी घरातून बाहेर पडण्यास विरोध केला आहे. या संदर्भात एक फतवा जारी करून त्याची मशिदीतील भोंग्यातून घोषणासुद्धा करण्यात आली आहे. 

मुस्लिमबहुल बांगलादेश हा अधिकृतरीत्या धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. देशात मुस्लिम धर्मगुरू अर्थात इमाम यांचा समाजावर जबरदस्त पगडा आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात मुस्लिम धर्मगुरूंचा प्रभाव अधिक आहे. बांगलादेशात २००१ सालापासून फतवा जारी करण्यावर बंदी लादण्यात आली आहे