Breaking News

राहुरी कारखाना कॉलनीत शेळ्यांची चोरी


राहुरी प्रतिनिधी - येथील कारखाना कामगार वसाहत परिसर आणि देवळाली प्रवरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. भरदिवसा शेळ्या लंपास झाल्याची घटना गुरुवारी घडली. कारखाना कॉलनीतून गुरुवारी दुपारी ५ शेळ्या लंपास झाल्या. ताराचंद दामू जाधव यांच्या मालकीच्या २, बाळू दामू जाधव आणि गर्जे यांच्या मालकीच्या ३ अशा एकूण ५ शेळया चोरी गेल्या आहेत. राहुरी कारखाना गेल्या ३ वर्षांपासून बंद अवस्थेत होता. या कालावधीत चोरयांचे प्रमाण वाढले होते. त्यावेळी कारखान्याची सुरक्षा व्यवस्था कमकुवत होती. मात्र आता सर्व सुरक्षा कर्मचारी कामावर हजर झाले असताना भरदिवसा चोरी होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांत चिंता पसरली आहे.