ठाण्यात प्रियकराच्या मदतीने दुस-या प्रियकराचा खून.
ठाणे, दि. 30, डिसेंबर - एका विवाहित महिलेने आपल्या पहिल्या प्रियकराच्या मदतीने दुस-या प्रियकराचा खून केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे यावेळी महिलेचा पती देखील घटनास्थळी होता. रामजी छत्रधारी शर्मा असे खून झालेल्या प्रियकराचे नाव असून सुमारी सुरेश यादव असे या विवाहितेचे आणि जयप्रकाश मंगरु चौहान असे खून क रणार्या तिच्या दुसर्या प्रियकराचे नाव आहे.
आरोपी महिला सुमारी यादव आणि मृत रामजी शर्मा यांच्यात अनैतिक संबंध होते. तसेच आरोपी जयप्रकाश चौहान याच्याशीही विवाहबाह्य संबंध होते. दरम्यान रामजी सुमारीला त्रास देत असल्यामुळे सुमारीच्या सांगण्यावरुन जयप्रकाशने रामजीचा अपघात घडवून आणला. त्यानुसार जयप्रकाशने सकाळी साडेपाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या रामजी शर्मा याला भरधाव चारचाकीने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या रामजी उपचारादम्यान मृत्यू झाला