Breaking News

सोवळं नेसलं नसल्याने अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला !

सातारा येथील श्रमिक मुक्ती दलाचे नेते आणि पुरोगामी विचारवंत भारत पाटणकर यांना आज सकाळी सोवळं नेसलं नसल्यामुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश नाकारला आहे. 


कोल्हापूरच्या मंदिरातील गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आंदोलन केलं होतं. गाभाऱ्यात जाऊन त्यांनी अंबाबाईचं दर्शनही घेतलं होतं. गेले काही दिवसांपासून कोल्हापूरच्या मंदिरात महिला पुजारी ठेवाव्यात अशी मागणीही केली जाते आहे.

पण आता मात्र भारत पाटणकर यांना फक्त सोवळे नेसले नाही म्हणून प्रवेश नाकारल्यामुळे खळबळ माजली आहे.कोल्हापूरचं अंबाबाईचं एक जागृत देवस्थान मानलं जातं. या मंदिराच्या गाभाऱ्यात गेली अनेक वर्ष स्त्रियांना प्रवेश नव्हता. तर मंदिराच्या गाभाऱ्यात पुरूषांना सोवळं नेसूनच प्रवेश दिला जाण्याची प्रथा आहे.