Breaking News

भारत-चीनदरम्यान शुक्रवारी सीमा चर्चा.

नवी दिल्ली : डोकलाम मुद्यावरील ७३ दिवसांच्या दीर्घ तणावानंतर भारत व चीनदरम्यान सीमा प्रश्नावर पहिली चर्चा होणार आहे. येत्या शुक्रवारी उभय देशांदरम्यान सीमा चर्चेचा पुढील टप्पा सुरू होणार आहे. 


राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व सीमावादावरील विशेष प्रतिनिधी अजित डोभाल यांच्या निमंत्रणावरून चीनचे विशेष प्रतिनिधी यांग जियेची २२ डिसेंबर रोजी विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेसाठी भारतात येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.