Breaking News

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची निदर्शने; बंदचा इशारा

अहमदनगर : राज्याच्या शिक्षण विभागाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत मागील तीन वर्षांपासून धुळफेक चालवली आहे.बैठकांमध्ये दिलेल्या आश्‍वासनाची अंमलबजावणी न करता दि.23 ऑक्टोबरला वरिष्ठ व निवड श्रेणीबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय काढण्यातआला. 


त्यामुळे आता दि.2 फेब्रुवारी 2018 रोजी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याबरोबरच त्यापुढील टप्प्यात बारावीच्या बोर्ड परीक्षेवेळीआंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्यावतीनेजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी संघटनेने त्वरित मागण्या मेनी करण्याची मागणी केली आहे.

या निदर्शनांमध्ये अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ.नवनाथ टकले, जनरल सेके्रटरी प्रा.मच्छिंद्रदिघे, कार्याध्यक्ष प्रा.भाऊसाहेब कचरे, प्रा.आश्रुबा शिंदे, प्रा.सोपानराव कदम, प्रा.राजीव जाधव, प्रा.दादासाहेब भालसिंग, प्रा.अशोक मोरे, प्रा.अशोक ताठे,प्रा.भाारत वाबळे, प्रा.जयश्री पवार, प्रा.स्मिता भुसे, प्रा.संध्या होशिंग, प्रा.योगिता माळशिकारे आदी सहभागी झाले होते.