Breaking News

मेट्रोच्या कामाची वर्षपूर्ती, 2019 ला होणार पहिला टप्पा पूर्ण

पुणे, दि. 25, डिसेंंबर - शहरवासियांना उत्सुकता लागून राहिलेल्या मेट्रोचा पहिला टप्पा 2019 अखेर पुर्ण होईल. त्यानुसार मेट्रोच्या 18 किलोमीटर मार्गावर 60 हुन अधिक खांबांची पायाभरणी पूर्ण झाली आहे. मेट्रोच्या भुमीपूजनाला रविवारी 1 वर्ष पूर्ण झाले.


मेट्रोसाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र मेट्रो रेल काँर्पारेशनकडे पुणे मेट्रोचे काम सोपविले होते. भुमीपूजनानतंर मेट्रोसाठी महापालिकेकडुन मेट्रो स्टेशनसाठी लागणार्‍या जागा हस्तांतर क रण्यात आल्यानतंर मेट्रोचा पहिल्या टप्प्यामध्ये पिंपरी ते रेंजहिल्स पर्यतचे काम सुरू झाले. या मार्गावर जागा हस्तांतर किंवा कोणताही अडथळा न आल्याने आता हे काम वेगाने सुरू झाले. मेट्रोच्या स्टेशनसाठी प्रसिध्द कंपन्यांची मदत घेतली जात आहे.

मेट्रोचा दुसरा मार्ग म्हणजे वनाझ ते शिवाजी नगर धान्य गोदाम असा आहे. हा 7 किलोमीटरचा मार्ग असून दोन्ही मार्गावर 60 हुन अधिका खांबाची पायाभरणी केली आहे. येत्या काही दिवसात मेट्रोच्या शिवाजीनगर धान्य गोदाम ते रामवाडी आणि रेंजहिल्स ते स्वारगेट या कामाची निविदा काढली जाणार आहे. विशेष म्हणजे शनिवार वाड ते स्वारगेट हा भुयारी मार्ग असल्याने या ठिकाणी काम करताना अधिकारी, कर्मचारी यांनी कसोटी लागणार असल्याची माहिती मेट्रोच्या अधिकार्‍यांनी दिली.