Breaking News

एसटीच्या अपघातात चालक ठार, ३० जखमी


बीड : अंबाजोगाई येथील वरवटी गावाजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला. मारूती गोपीनाथराव कातकडे (वय ४०) असे चालकाचे नाव आहे. तर ३० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंबाजोगाई आज सकाळी ८ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. गंगाखेड - पुणे आणि लातूर - परभणी या दोन बस समोरासमोर येवून एकमेकांवर आदळल्या. यात चालक कातकडे जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.