Breaking News

आशा सेविकांचे मानधन वाढवून मिळालायलाच हवे : आ. थोरात.


संगमनेर /प्रतिनिधी-प्रत्येक माणसासाठी आरोग्य हे सर्वांत महत्वाचे आहे. तळागळातील सर्व सामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या आशा सेविकांचे काम गौरवास्पद असून सरकारने त्यांचे मानधन वाढविलेच पाहिजे, अशी आग्रही मागणी शासनाकडे मा. महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
पंचायत समिती येथे आशा सेविका दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सभापती निशाताई कोकणे बोलत होत्या. तर व्यासपीठावर उपसभापती नवनाथ आरगडे, अजय फटांगरे, मिलींद कानवडे, शांताबाई खैरे, मिराताई शेटे, प्रियंका गडगे, बेबीताई थोरात,सुनंदा जोर्वेकर, विष्णु रहाटळ, सदाशिव वाकचौरे, किरण मिंडे, सिताराम राऊत, शिवाजीराव थोरात, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, डॉ. सुरेश घोलप, दत्तात्रय कोकणे, अशोक सातपुते, कानवडे आदीं उपस्थित होते.

यावेळी आमदार थोरात म्हणाले कि, ग्रामीण भागात नागरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विशेषत: महिला स्वत:च्या आरोग्याची अजिबात काळजी घेत नाहीत. परंतु आरोग्य जनजागृती बरोबरच आशा सेविका ह्या तात्काळ सेवा देतात. मदतीला धावतात त्यांच्या कामाची दखल घेतली गेलीच पाहिजे. या महिला भगिनींचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहे. विशेषत: त्यांचे मानधन तातडीने वाढविलेच पाहिजे. यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करु तसेच विधान सभेत ही सरकारला जाब विचारु असा विश्‍वास दिला.


 त्याचबरोबर शासनाच्या अनेक योजना असतात. त्या योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून दयावा. संघटीत कामगार यांना बचत गट मोठे बळ देईल. यासाठी ही आशा सेविकांनी पुढाकार घ्यावा. नागरिकांच्या आरोग्याबाबत अधिक जागृकता दाखवितांना जनतेची कामाच्या माध्यमातून सेवा करा असे आवाहनही त्यांनी केले आहे. आरोग्य विभागाने अधिक दक्षता घेतांना तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांत आधुनिकता आणावी. नागरिकांना तात्काळ सेवा द्याव्यात. आशा सेविका ह्या ग्रामीण भागात चांगले काम करीत असून प्रशासनाच्या वतीने त्यांना जास्तीत जास्त मदत करा असे आवाहनही त्यांनी केले.

 उपसभापती नवनाथ अरगडे म्हणाले की, नागरिकांना चांगल्या सुविधा देणे हेच आपले प्राधान्य असून जनतेला अथवा आरोग्य सेविकांना काही अडचणी आल्यास तात्काळ पदाधिकार्‍यांधी संपर्क करावा. याचबरोबर आ.थोरात यांच्या यशोधन कार्यालयातूनही गाव पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी मदत करत येईल. यावेळी प्रियंका गडगे, विष्णु रहाटळ, मिलींद कानवडे यांनीही सूचना दिल्या. यावेळी तालुक्यातील आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.