Breaking News

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; प्रवाशाचे पाकिट दिले परत

मुंबई, दि. 14, डिसेंबर - ट्रॉम्बेतील एका रिक्षाचालकाने प्रवाशाचे पाकीट परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे. अनिल दाप असे रिक्षाचालकाचे नाव आहे. प्रवाशाच्या पाकिटात साडेसात हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. 


देवनार येथे वास्तव्यास असलेले श्याम गावडे हे तेलकंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सकाळी कामावर जातानाचा देवनारपासून गोवंडीपर्यंतचा प्रवास रिक्षाने केला. त्यावेळी रिक्षाचे भाडे देताना ते आपले पाकीटच रिक्षात विसरले. या पाकिटात महत्त्वाच्या वस्तूंसह 7,500 रुपये होते. मात्र दुपारी त्यांना रिक्षाचालक अनिल दाप यांचा दुरध्वनी आला. तुम्ही तुमचे पाकीट रिक्षात विसरले असल्याचे अनिल यांनी सांगितले. त्यानंतर गावडे यांनी अनिल यांची भेट घेवून त्यांचे कौतुक करुन पाकीट ताब्यात घेतले.