Breaking News

जिल्हा सहकारी बँकांमधून ठेवीदारांचे पैसे देण्यास सुरुवात


शासनाने कर्जमाफीचे पैसे जिल्हा सहकारी बँकेत जमा केल्याने या बँका आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असून खातेदारांच्या ठेवीची रक्कम परत करण्यास सुरुवात झाली आहे, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानपरिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
सदस्य प्रा.अनिल सोले यांनी नागपूर, वर्धा व बुलढाणा जिल्ह्यातील सहकारी बँकेतील खातेदारांना ठेवींची रक्कम परत मिळत नसल्याबाबतचा प्रश्न विचारला होता.

श्री.देशमुख म्हणाले, नागपूर, वर्धा व बुलढाणा सहकारी बँकेला यापूर्वीच शासनाने आर्थिक मदत केली आहे. या बँकात ज्या शेतकरी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांनी ठेवी ठेवल्या आहेत त्या त्यांना परत करण्याची कार्यवाही बँकांनी सुरु केली आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्री.नागो गाणार यांनी सहभाग घेतला.