Breaking News

नितीन आगे प्रकरणी सावंतवाडीत धरणे

सिंधुदुर्गनगरी, दि. 16, डिसेंबर - अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यतल्या खर्डे गावातल्या नितीन आगे या विद्यार्थ्यांला शालेय कामकाजावेळी वर्गातून बाहेर काढून त्याला मारहाण करणार्‍या आणि त्याच्यावर अत्याचार करून त्याला जिवंत मारणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरता या खटल्याची फेर चौकशी व्हावी याकरता राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती सिंधुदुर्गच्या वतीने सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.


अहमदनगर जिल्यातील जामखेड तालुक्यतील खर्डे गावातील नितीन आगे या विद्यार्थ्यांला अमानुष पणे मारहाण करणार्‍या मारेकर्‍यांना कठोर शिक्षा व्हावी या करता महाराष्ट्रतल्या 36 जिल्ह्यातल्या 360 तालुक्यातल्या मागासवर्गीय बांधवानी प्रत्येक तालुक्यात धरणे आंदोलन केले. यात असंख्य बांधव सहभागी झाले होते. 

या आगे खून प्रकरणातील साक्षीदार फिरल्याने यातील आरोपी सुटले. त्यामुळे पोलीस यंत्रणा प्रशासन यात कमी पडले असा आरोप यावेळी मागासवर्गीयांनी केला. नितीन आगे कुटूंबियांना पोलीस संरक्षण दयावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात भटक्या जातीचा समावेश करावा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील तानाजी कांबळे या मागसवर्गीय बांधवास मारहाण करणार्‍याची फेर चौकशी व्हावी अशा विविध मागण्यांच निवेदन यावेळी तहसीदाराना देण्यात आले.