रिक्षाचालकांचा शाळकरी मुलीवर अत्याचार.
कौटुंबिक ओळखीचा गैरफायदा घेऊन दोघा नराधम रिक्षाचालकांनी शाळकरी मुलीला धमकावून तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या अत्याचारप्रकरणी विजयकुमार हरिहर यादव व संदीप सुरेश पाटील या दोघा नराधमांना शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.
रिक्षाचालक विजयकुमार याने कणेरी येथील नववीत शिकणाऱ्या १३ वर्षीय शाळकरी मुलीला आपल्या जाळ्यात ओढून तिच्या घरच्यांना ठार मारण्याची धमकी देऊन ५ नोव्हेंबर रोजी व त्यानंतरच्या रविवारी अंजूर फाटा येथील एका इमारतीच्या खोलीत नेऊन अत्याचार केला.
त्यानंतर याची माहिती तुझ्या घरच्यांना देईन, अशी धमकी देऊन कारचालक संदीप पाटील याने मुलीला मागील दोन रविवारी अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार केला. दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २६ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली.