Breaking News

पुणे इमारत दुर्घटनेतील तीनही कामगारांच्या कुटुंबांना दहा लाख रुपयांची मदत


पुणे शहरातील सेया या इमारतीचे काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेतील मृत तीन कामगारांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषद सदस्य श्रीमती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहरातील सेया या दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृत कामगारांच्या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना श्री. निलंगेकर बोलत होते. राज्यातील कामगारांच्या सुरक्षेला शासन प्राधान्य देत आहे. 

यासाठी नोंदणीकृत कामगारांची नोंदणी करण्यात येते. सेया या इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2017 साली 6 लाख कामगारांची नोंदणी झाली असून राज्यात सुमारे 27 लाख नोंदणीकृत कामगार आहेत. कामगारांसाठी येत्या काळात महाआवास ही योजना सुरू करण्यात येणार आहे. तसेच कामगारांच्या नोंदणीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचे श्री. निलंगेकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.