Breaking News

हमाल मापाडी महामंडळाच्या प्रदेश सहचिटणीसपदी घुले यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या प्रदेश सहचिटणीसपदी अविनाश (तात्या) घुले यांची निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा अ‍ॅटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 


यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष कॉ.बाबा आरगडे, सल्लागार विलास कराळे, उपाध्यक्ष दत्ता वामन, केशव बरकते, अशोक औशीकर, गोरख आंबेकर, लतिफ शेख, दत्ता चवंडके, अशोक कार्ले, श्रीकांत दंडवते, हर्षल नागापुरे, प्रकाश कोटकर, प्रल्हाद खांबट, अलाउद्दीन पठाण,साहेबराव पाचरणे, गणेश गांगर्डे, नितीन शेंडे, हरीभाऊ हराळे, गणेश आटोळे आदि उपस्थित होते.

अविनाश घुले यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यावर कार्य करण्याची संधी मिळाली आहे. जिल्ह्यातील हमाल, मापाडीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी ते सदैव कटिबध्द असून, त्यांच्या रुपाने कष्टकरी हमाल मापाडींना न्याय मिळणार असल्याची भावना कॉ.बाबा आरगडे यांनी व्यक्त केली. 

दत्ता वामन म्हणाले की, वंचित व कष्टकर्‍यांसाठी झटणारे अविनाश घुले यांची झालेली निवड ही त्यांच्या कार्याची पावती आहे. रिक्षा चालकांच्या प्रश्‍नावर मोठा संघर्ष करुन, त्यांनी रिक्षा चालकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. विलास कराळे यांनी घुले यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा व्यक्त करुन, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.