मुंबई, दि. 10, डिसेंबर - विमानात एका प्रवाशाकडे चाकू सापडल्यामुळे मुंबईहून डेहरादूनला जाणारे विमान तातडीने उतरविण्यात आले आहे. या घटनेमुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.विमानातील सीट नंबर 16 डीईफवर बसलेल्या प्रवाशाकडे हा चाकू सापडला. सफरचंद कापण्यासाठी प्रवाशाने हा चाकू काढल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रवाशाकडे चाकू आला कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला जबाबदार कोण असाही प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
प्रवाशाकडे चाकू सापडल्याने मुंबई-डेहरादून विमानाचे इमरजन्सी लँडिंग
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:34
Rating: 5