Breaking News

’ठाकरे’ चित्रपटाच्या इंग्रजी पोस्टरला दिग्दर्शक तरडे यांचा आक्षेप


मुंबई, दि. 25, डिसेंंबर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील आधारित ’ठाकरे’ या चित्रपटाच्या पोस्टरला मराठी अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आक्षेप घेतला आहे. ’देऊळ बंद’ या माझ्या चित्रपटाच्या वेळेस मी पोस्टर इंग्रजीत केले होते. त्यावेळी शिवसेनेकडून विरोध करण्यात आला होता. तेव्हा मी त्यांचा मान राखला होता, असे दिग्दर्शक तरडे यांनी सांगितले.ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत ’ठाकरे’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी चित्रपटाचा टीझर व पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले.