कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालणार्या 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी, दि. 25, डिसेंंबर - भडवळे (ता. दापोली) येथील एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घातल्या प्रकरणी 13 जणांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल क रण्यात आला आहे.याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या विरार येथे राहणारे भडवळे ऊसवाडी येथील ग्रामस्थ दत्ताराम रामचंद्र लोंढे यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार लोंढे यांच्या वडिलांच्या नावे लालबाग (मुंबई) येथील एका चाळीत खोली होती. चाळ जीर्ण झाल्यावर तेथे म्हाडाची इमारत उभारण्यात आली. त्यानंतर ती जागा व डिलांच्या नावे झाली. या खोलीत भडवळे कोकणातून जाणार्या गरजू लोकांना वडिलांच्या तोंडी शब्दावर राहण्याची व्यवस्था करत असत. या खोलीत दत्ताराम लोंढे स्वतःही राहत होते. 1983 मध्ये लोंढे यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर दत्तात्रय लोंढे यांनी ही खोली आपल्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र ती खोली वाडीवाल्यांची असून ती यापूर्वी लोंढे यांच्या वडिलांनी आपले नावावर करून घेतली, असे वाडीवाल्यांचे म्हणणे होते. या खोलीच्या मालकीच्या पार्श्वभूमीवर 3 डिसेंबर 17 रोजी भडवळे ऊसवाडी येथील अशोक रेवाळे यांच्या घरी सकाळी 11 वाजता एक बैठक झाली. बैठकीत दत्ताराम लोंढे यांचा भाऊ जनार्दन आणइ भावजय जोत्स्ना हजर होते. तेव्हा या बैठकीत लोंढे यांच्या व डिलांच्या नावे असलेल्या खोलीचा विषय काढून विचारणा केली असता जनार्दन लोंढे यांनी या विषयाकरिता आपल्ला भावाला बोलावणे गरजेचे आहे, असे सांगितले. तेव्हा या बैठक ीला उपस्थित असलेल्या 13 जणांनी जनार्दन लोंढे यांच्या कुटुंबीयांशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत, त्यांच्याकडे जाणेयेणे करायचे नाही, त्यांना कामधंद्याला बोलावयाचे नाही असे ठरविले आणि कुटुंबाला अलिप्त ठेवले.याबाबतची तक्रार दत्ताराम लोंढे यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली असून दापोली पोलिसांनी त्या तक्रारीनुसार 13 जणांवर महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
