रिक्षा चालकाने केला दीड लाखाचा मुद्देमाल परत
सोलापूर, दि. 25, डिसेंंबर - पोलिसांच्या प्रयत्नातून आणि रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे मुंबईच्या महिलेला 5 तोळे सोन्यासह 1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल परत मिळाला. ही घटना जिल्ह्यातील स्टेशन चौकी येथे घडली. याबाबत रिक्षा चालक कमुलाल पटेल, पोलीस उपनिरीक्षक नारायण भोसले, ठाणे अंमलदार गणेश माने, कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
कल्पना जनार्धन तोरणे (रा. ठाणे) या आपली मुलगी श्रुतीसह मुंबईहून सिद्धेश्वर एक्सप्रेसने लग्न कार्यासाठी सोलापूरला आल्या होत्या. येथील स्टेशन जवळील गणेश हॉटेल येथून त्यांनी रिक्षा केली. त्या रिक्षाने सिद्धार्थ चौक येथे पाहुण्याकडे पोहोचल्यानंतर आपली बॅग रिक्षातच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. कल्पना तोरणे यांनी स्टेशन चौकीत जावून घटनेची माहिती दिली. तात्काळ घटनेची दखल घेत पोलीस उपनिरीक्षक नारायण भोसले, ठाणे अंमलदार गणेश माने, प्रशांत चव्हाण यांनी बॅगेतील मोबाईलवर संपर्क क रुन रिक्षा चालकाला चौकीला बोलवून घेतले. रिक्षा चालक कमुलाल पटेल यांनी रिक्षात विसरलेली बॅग परत केली. या बॅगेत 4 तोळ्याचे मोठे मंगळसुत्र, 1 तोळ्याचे लहान मंगळसूत्र, कर्णफूल, 10 हजाराची रोख रक्कम आणि 2 मोबाईल हँडसेट असा ऐवज मिळाला. तो कल्पना तोरणे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. यावेळी तोरणे यांनी रिक्षा चालकास एक हजार रुपये बक्षीस दिले. आयुष्यभराची पुंजी परत मिळाल्याने कल्पना तोरणे यांनी पोलिसांचे आणि रिक्षा चालकाचे आभार मानले.